
‘कालनिर्णय’तर्फे यंदादेखील वाचकांसाठी ‘पाकनिर्णय 2024’ ही पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी चार विभाग ठरविण्यात आले असून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या पाककृती या चार विभागाअंतर्गत पाठवणे आवश्यक आहे.
मांसाहारी कबाब, चटपटीत चाट, वाफवलेले पदार्थ, गूळ, साखर, मध न घालता केलेले गोड पदार्थ हे चार विभाग पाककृतीसाठी आहेत. प्रत्येक स्पर्धक जास्तीत जास्त दोन विभागांसाठी पाककृती पाठवू शकतात. स्पर्धकांनी आपली पाककृती आणि पाककृतीचा स्पष्ट फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा पोस्ट अथवा कुरिअरने पाठवायचा आहे. www.kalnirnay.com/paknirnay या लिंकवर पाककृती अपलोडही करता येईल. स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक त्यानंतर पदार्थाचे नाव, साहित्य आणि कृती या क्रमाने पाककृती लिहून पाठवायची आहे. पाककृती पाठवण्याची अंतिम तारीख 15 मे असून प्रत्येक विभागातून तीन विजेते निवडण्यात येतील. सर्वोत्कृष्ट 12 पाककृती कालनिर्णय 2024 तर उत्तेजनार्थ 18 पाककृती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2013’ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. काही खास पाककृती स्वादिष्ट 2024 मधून प्रसिद्ध होतील. स्पर्धेबाबत परीक्षकांचा आणि कालनिर्णय व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल, असे कालनिर्णयचे संपादक, प्रकाशक जयराज साळगावकर यांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीसाठी संपर्क – www.kalnirnay.com/paknirnay
पाककृती पाठविण्यासाठी पत्ता : पाकनिर्णय 2024, सुमंगल प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, 172, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर (पूर्व), मुंबई – 400 014 दूरध्वनी – 022-24134884/5051






























































