पाकड्यांचा सीमेवर गोळीबार; ‘बीएसएफ’चा अधिकारी शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

पाकडय़ांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पुँछ आणि राजौरी जिल्ह्यातील मनकोट, कृष्णाघाटी सेक्टरसह गुवापूर, शाहपूर, किरनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. यात सीमा सुरक्षादलाचे (बीएसएफ) इन्स्पेक्टर टी. अलेक्स शहीद झाले. एक महिला आणि पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. गोळीबारात सहा जवानांसह 11 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सीमेवर तणाव वाढला असून, पाकडय़ांच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकडय़ांनी सीमेवरील गावांना आणि हिंदुस्थानी जवानांच्या चौक्यांना टार्गेट केले. सहा घरांचे नुकसान झाले आहे. शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या गोळीबारात बीएसएफचे इन्स्पेक्टर टी. अलेक्स शहीद झाले. साजदा ही महिला आणि सोबिया (वय 5) ही मुलगी मृत्यूमुखी पडली आहे. 11 जण जखमी झाले. त्यात सहा जवान असून, लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकडय़ांकडून रात्री उशीरापर्यंत गोळीबार सुरूच होता. या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

कार सिलिंडर स्फोटप्रकरणी एका संशयित दहशतवाद्याला अटक
शनिवारी जम्मू-श्रीनगर महामार्गावर बानिहाल येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर एका कारमधील सिलिंडरचा स्फोट झाला. याप्रकरणी अटक केलेला कारचालक हा हिजबुल मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी असल्याची माहिती आहे. कारमध्ये पेट्रोल, जिलेटीनच्या कांडय़ा, युरिया आणि सल्फर आढळले. ‘आयईडी’ स्फोटके बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेली कार घुसून भयंकर दहशतवादी हल्ला केला होता. याची पुनरावृत्ती करण्याचा कट बानिहाल येथे होता का याचा सखोल तपास सुरू आहे.