
हिंदुस्थानात दहशतवादी घुसवण्यासाठी जम्मू-कश्मीरच्या सीमेवरील आरएसपुरा आणि सांबा सेक्टरमधील लष्करी ठिकाणांवर ड्रोनद्वारे हल्ला करण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) मिळाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर बीएसएफ अधिक सतर्क झाले आहे.
सीमेवर लष्कर अधिक दक्ष असल्याने पाकिस्तानला एलओसीवरून दहशतवादी घुसवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानचे हल्ले वाढले आहेत. दुसरीकडे लडाख सीमेवर चीनच्या हालचाली थांबलेल्या नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कराला या दोन्ही सीमांवर डोळ्यांत तेल घालून रहावे लागत आहे. पाकिस्तानची आयएसआय संघटनाही हिंदुस्थानात अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही बीएसएफला मिळाली आहे.
शनिवारी पंजाबमधील तरन तारन सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाNया पाच दहशतवाद्यांना बीएसएफने यमसदनी धाडले. दहशतवाद्यांकडे एक एके-४७ रायफल, ४ पिस्तुली आणि साडेनऊ किलो हेरॉईन सापडले. गेल्या जूनमध्ये पाकिस्तानच्या दिशेने जम्मू-कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रायफली आणि ग्रेनेड्स घेऊन आलेले एक ड्रोन बीएसएफने पाडले होते.



























































