पाकिस्तानचा ड्रोन हिंदुस्थानी हद्दीत घुसला, जवानांनी हुसकावून लावलं

653

पंजाब येथील फिरोजपूर येथे पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत दिसून आला. सोमवारी रात्री हा ड्रोन हिंदुस्थानी हद्दीत घुसला होता. यापूर्वीही 16 ऑक्टोबर रोजी फिरोजपूरमध्येच पाकिस्तानी ड्रोन दिसला होता.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, फिरोजपूर येथील हुसैनीवाला भागात सोमवारी रात्री हजारा सिंह वाला आणि बाकडी या दोन गावच्या ग्रामस्थांनी हा ड्रोन उडत असलेला पाहिला. तो बीएसएफच्या एच के टॉवरपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर बीएसएफ जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार चुकवत तो ड्रोन तिथून निघून पाकिस्तानच्या दिशेने गेला.

यापूर्वीही 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी ड्रोन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसला होता. सतलज नदीच्या किनाऱ्यावरील शेतांवर तो उडत असल्याचं बीएसएफला आढळून आलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या