जेएनयू हल्ल्याविरोधात पाकिस्तानमध्ये मोर्चा, शिक्षक व विद्यार्थी सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू)मध्ये झालेल्या हल्ल्याविरोधात हिंदुस्थानसह पाकिस्तानमध्येही विरोध सुरू आहे. बुधवारी लाहोरमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. लाहोर प्रेस क्लबपासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षक सहभागी झाले.

शायर फैज अहमद फैज यांची नज्म ‘लाजिम है कि हम भी देखेंगे’ या संकल्पनेच्या आधारावर हा मोर्चा काढण्यात आला. शायर फैज अहमद फैज यांच्या याच नज्मवरून हिंदुस्थानमध्ये वादही सुरू आहे. सोशल मीडियावर या नज्मवरून नेटिझन्स आमने-सामने आले आहेत. अशातच पाकिस्तानमधील मोर्चा या नज्मच्या संकल्पनेवरून काढण्यात आल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

lahore-rally1

दरम्यान, जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविरोधात हिंदुस्थानमध्ये विविध कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु आहेत. आयआयएम अहमदाबाद येथी विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनातही शायर फैज अहमद फैज यांची नज्म गायली गेली. याआधी आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी देखील ही नज्म म्हटली होती. त्यामुळे मोठा वाद सुरू आहे.

दीपिका पदूकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य, भाजप खासदाराची टीका