आम्ही आता शांत बसणार नाही; इमरान खान यांची पुन्हा दर्पोक्ती

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. हिंदुस्थानी लष्कराचे जवान पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे पाकड्यांची टरकली असून आता त्यांनी पुन्हा दर्पोक्ती केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून होणारे लष्करी हल्ले सुरूच राहिल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगत हिंदुस्थानला धमकी देत दर्पोक्ती केली आहे. मात्र, पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनेला हिंदुस्थानी जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. हिंदुस्थानकडून कधीही हल्ला करण्यात येत नाही. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटणार आहे. हिंदुस्थानी जवानांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईने पाकिस्तानची टरकली असल्याचे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

सीमेपलीकडून सातत्याने गोळीबार करण्यात येतो. त्यात अनेक निरपराध नागरिक बळी पडत असल्याचा कांगावाही पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घ्यावी असेही इमरान म्हणाले. राष्ट्र सैन्य प्रयवेक्षक समूहाने हिंदुस्थानच्या हालचालींवर नजर ठेवावी आणि कश्मीरचा दौरा करावा, असेही त्यांनी सांगितले. हिंदुस्थानी लष्कराच्या फ्लॅग ऑपरेशनमुळे भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हिंदुस्थान कधीही हल्ला करत नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येते, या भागात हिंदुस्थानला शांतता हवी आहे. हिंदुस्थानचे धोरण आंतरराष्ट्रीय समुदायाला माहित आहे, त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. सीमाभागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणाच मोर्टार डागण्यात येत आहेत. हिंदुस्थानी लष्कर या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून शस्त्रंसधी उल्लंघनाच्या घटना दुपटीने वाढल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 2018 मध्ये 1,629 शस्त्रंसधी उल्लंघनाच्या घटना घडल्या होत्या. तर 2019 मध्ये 3,200 घटना घडल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधूल कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधात कांगावा करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या