ICC T20 WC 2026 – हिंदुस्थानविरुद्ध सामना खेळण्यास पाकिस्तान तयार; पण ठेवल्या तीन अटी, ICC-BCCI काय निर्णय घेणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकपला शनिवारपासून सुरूवात झाली असून पहिल्या दोन दिवसात सहा सामने पार पडले. पहिल्या दोन दिवसातच स्पर्धेतील प्रमुख संघांना लिंबूटिंबू समजणाऱ्या जाणाऱ्या संघांनी चांगलेच आव्हान दिले. एकीकडे ही स्पर्धा पुढे सरकत असताना दुसरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष 15 फेब्रुवारीला होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मात्र पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतली असून हिंदुस्थानविरुद्ध सामना खेळण्यास होकार दिला, परंतु तीन अटीही घातल्या आहेत. ‘क्रीकबझ’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आयसीसी वर्ल्डकपमध्ये 15 फेब्रुवारीला हिंदुस्थान-पाकिस्तान सामना नियोजित आहे. या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला होता. आता या सामन्यात खेळण्यास पाकिस्तान तयार झाला आहे, मात्र आयसीसी समोर तीन अटी ठेवल्या आहेत. मागण्या मान्य झाल्यास पीसीबी आपल्या सरकारशी चर्चा करून सामना न खेळण्याचा निर्णय मागे घेण्यावर विचार करू शकते.

रविवारी लाहोरमध्ये पीसीबीचे सदस्य आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी आयसीसीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना नियोजित वेळापत्रकानुसार व्हावा, यासाठी सुवर्णमध्य काढणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

Shubham Ranjane Journey – 3 पिढ्या, 3 वेगळी मैदाने! आजोबा हिंदुस्थानकडून खेळले, वडील महाराष्ट्राकडून; तर शुभमने निवडली अमेरिकेची वाट

काय आहेत तीन अटी

1. आयसीसीकडून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील हिस्सा वाढवून द्यावा अशी अट पीसीबीने ठेवली आहे.
2. हिंदुस्थानसोबत पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट मालिका सुरू करण्यात यावी.
3. मैदानावर खेळाडूंनी प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी करत एकमेकांशी हस्तांदोलन करावे.

बहिष्काराचे कारण काय?

बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव हिंदुस्थानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीने वर्ल्डकपमधून बांगलादेशला डच्चू दिला. बांगलादेशची हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तानमधील शरीफ सरकारने हिंदुस्थानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता. हा सामना तटस्थ ठिकाणी होणार असूनही पाकिस्तानने यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

धोनीप्रमाणे मोठे षटकार ठोकून सामना संपवायला आवडेल! इंग्लंडविरुद्ध थरारक पराभवानंतर नेपाळच्या खेळाडूचे विधान

आयसीसीला कोंडीत पकडले

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना झाला नाही, तर आयसीसीला प्रसारणातून मिळणाऱ्या महसुलात प्रचंड मोठा फटका बसेल. याच गोष्टीचा फायदा घेऊन पीसीबी आयसीसीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान सध्या आयसीसीच्या कमाईतून अंदाजे 34.51 दशलक्ष डॉलर्स कमावतो. बीसीसीआय 293 दशलक्ष डॉलर्स, ईसीबी 139 दशलक्ष डॉलर्स आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया 128 दशलक्ष डॉलर्स यांच्यानंतर पाकिस्तानचा चौथा क्रमांक लागतो.

“दोन दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये बिर्याणी खात होता अन् अचानक…”; मोहम्मद सिराजबाबत CSK च्या माजी खेळाडूची मजेशीर टिप्पणी