‘समझौता’नंतर आता पाकिस्तानने रोखली ‘थार एक्सप्रेस’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रद्द केल्यानंतर आता जोधपूर ते कराची दरम्यान धावणारी थार एक्सप्रेस देखील पाकिस्तानने रोखली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या या निर्णयाचा निषेध करत हा त्यांचा एकतर्फी निर्णय असल्याचे सांगितले आहे.


आम्ही थार एक्सप्रेसदेखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मी रेल्वे मंत्री राहिन आता पाकिस्तान व हिंदुस्थानच्या दरम्यान एकही एक्सप्रेस धावणार नाही, असे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री राशिद शेख सांगितले आहे.

पाकिस्तानच्या या निर्णयाचा हिंदुस्थानने ननिषेध केला आहे. ‘पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय एकतर्फी आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही त्यांना या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले आहे’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले.