पाकिस्तानकडून अखनूर व सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकड्यांच्या सीमाभागातील कुरघोड्या सुरूच असून आज पुन्हा पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी लष्कराने जम्मू व राजौरी जिल्ह्यातील सीमा भागात गोळीबार केला आहे. या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टर व जम्मूमधील अखनूर सेक्टरमधील केरी बट्टाल भागात पाकड्यांकडून गोळीबार करण्यात आला.