BREAKING : अभिनंदनला अटक करणाऱ्या पाकिस्तानी कमांडो ‘खान’चा खात्मा

2161
wing-commander-abhinandan-v

हिंदुस्थानी वायूदलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या छळाचा हिंदुस्थानने बदला घेतला आहे. अभिनंदन यांना अटक करणाऱ्या पाकिस्तानच्या कमांडोचा लष्कराने खात्मा केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानी कमांडो सुभेदार अहमद खान याला ठार केले. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करताना लष्करी जवानांनी त्याला टिपले.

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्तानने हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. वायूदलाने हा हल्ला परतावून लावला होता. यादरम्यान विंगकमांडर अभिनंदन यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यांना पाकिस्तानने अटक केली. पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे सुभेदार अहमद खान यांनी त्यांना अटक केली होती.

27 फेब्रुवारीला अभिनंदन यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अभिनंदन यांच्या पाठीमागे पाकिस्तानचा दाढीवाला सैनिक सुभेदार अहमद खान उभा असलेला फोटो व्हायरल झाला होता. आता अभिनंदन यांच्या अटकेत सहभागी असणाऱ्या सुभेदार अहमद खान याचा नकियाल सेक्टरमध्ये 17 ऑगस्टला लष्कराने खात्मा केला. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करताना हिंदुस्थानी जवानांच्या गोळीबारात तो ठार झाला.

abhinandan

आपली प्रतिक्रिया द्या