लष्कराची पोलिसांना मारहाण

पाकिस्तानातील सैनिकांनी बुधवारी पंजाब प्रांतातील बहावलनगरमध्ये पोलीस अधिकाऱयांवर हल्ला केला. ही घटना मदरिसा पोलीस ठाण्यात घडली. सैनिकांनी स्टेशन हाऊस ऑफिसर आणि स्टेशन प्रभारी यांनाही जखमी केले. अधिकाऱयांच्या शरीरावरील जखमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सैनिकांच्या हल्ल्यात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.