पालघरमधील वाढवण बंदराविरोधात आंदोलन, माकपचे आमदार विनोद निकोले पोलिसांच्या ताब्यात

पालघर जिल्ह्यातील हजारो भुमिपुत्र आणि मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या वादग्रस्त वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा नारळ येत्या 25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फोडण्याचा घाट ‘जेएनपीए’ने घातला आहे. त्या विरोधात आज स्थानिक भूमीपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी माकपचे आमदार विनोद निकोले यांनी ताब्यात घेतले आहे.