गर्दीमध्ये सामान हरवण्यापासून सुटका होणार, बॅगच तुमच्याशी संवाद साधणार

2972

ग्राहकांशी हुशारीने संवाद साधू शकतील अशा नव्या पिढीच्या प्रवासी सूटकेसची निर्मिती करण्यासाठी सॅमसोनाईट आणि पॅनासॉनिक एकत्र आले आहेत. आजच्या स्मार्ट प्रवाशांना विना-कटकटीचा प्रवास करता यावा यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय-योजना देण्याकरिता सॅमसोनाईटच्या ईव्हीओए टेक या नव्या उत्पादनात पॅनासॉनिकचा सिकिट ब्ल्यूटूथ ट्रॅकर देण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सामान सहजतेने ओळखता आणि शोधता येईल. त्यामुळे आता गर्दीमध्ये सामान हरवण्यापासून ग्राहकांची सुटका होईल.

पॅनासॉनिकच्या सिकिट ब्ल्यूटूथ ट्रॅकरसह असणारी सॅमसोनाईट ही सामान गहाळ होण्याच्या अवस्थेत धोक्याची घंटी वाजविण्याची, शोधण्याची आणि त्वरित काम करण्याची क्षमता वापरून सामानाशी संबंधीत कोणतेही धोके कमी करण्यात कुशल असणार आहे. आकर्षक ब्ल्यूटूथ ट्रॅकर, सिकिट हे पॅनासॉनिकच्या देशातील केंद्रात विकसित केले गेले आहे.

सॅमसोनाईट दक्षिण आशियाचे सीईओ जय कृष्णन म्हणाले, उत्कृष्ट तंत्रज्ञानाने सक्षम असणारे, विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे आणि प्रवासादरम्यान शोभा वाढवणारे लगेज ग्राहकांना उलब्ध करून देणे हे या लोकार्पणामागचे उद्दिष्ट आहे. बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टम, अंतर्गत वजनकाटा आणि युएसबी पोर्ट अशा काही क्रांतिकारी वैशिष्ट्यांचा आम्ही यात समावेश केला आहे. ब्ल्यूटूथ सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी पॅनासॉनिकची निवड ही साहजिक होती. पॅनासॉनिक्सच्या तंत्रज्ञान क्षमतांचा वापर सॅमसोनाईट सूटकेसमध्ये केला गेल्याने ग्राहकांना प्रवासासाठी अतिशय उत्कृष्ट आणि जास्त कार्यक्षम मार्ग सापडणार आहे.”

पॅनासॉनिकचा सिकिट ब्ल्यूटूथ ट्रॅकर असणारी सॅमसोनाईट ब्ल्यूटूथ 5.0 वर आधारित 14 विविध कार्य पार पाडतो. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये ग्राहकांना त्यांचे सामान जवळपास आहे ते समजावे यासाठी सेपरेशन इंडीकेटर आहे आणि ज्या क्षणी ते त्यांच्या सामानापासून दूर जातील त्याक्षणी त्यांना त्याची माहिती मिळेल. बाय-डिरेक्शनल ट्रॅकिंग वैशिष्ट्यामुळे, सिकिट ग्राहकांना त्यांचे सामान शोधायलाच मदत करत नाही तर, ट्रॅकरवरील बटण केवळ दोनदा दाबून त्यांचा फोनदेखील शोधून देते. प्रॉक्सीमीटी गायडन्स ही ग्राहकांना त्यांच्या सामानाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करते आणि फाइंड युवर लगेज त्यांना त्यांच्या अॅपवरील बझ बटण दाबून त्यांचे सॅमसोनाईट लगेज सहजपणे ओळखण्यासाठी मदत करते. सिकिट उपकरण सेल्फी बटणासह देखील उपलब्ध असून त्यामुळे उपयोगकर्त्यांना प्रवासादरम्यान त्यांचे सर्वोत्तम सेल्फी काढण्याची संधी मिळते. याखेरीज, सिकिट वरील बटण तीनदा दाबून ग्राहक 3 जणांना त्यांच्या जीपीएस लोकेशनवर एसओएस संदेश पाठवू शकतात. याशिवाय, उत्कृष्ट ग्राहक अनुभव आणि मान्यतेसाठी पॅनासॉनिक जापनीज, चायनीज, इंग्लिश, कोरियन भाषेत इन- अॅप लँग्वेज सपोर्ट देऊ करते.

आपली प्रतिक्रिया द्या