
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी पंढरपूर शिवसेनेच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाईची तुळशी पूजा करण्यात आली. पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे व शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय घोडके यांच्या हस्ते तुळशी पूजा करण्यात आली. त्याच बरोबर मातोश्री वृद्धाश्रम येथे जेष्ठ नागरिकांना शिवसेना पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने मिष्ठांन भोजन वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख जयवंत माने, शिवसेना पंढरपूर विभाग उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, बाबासाहेब अभंगराव, सचिन बंदपट्टे, शिवसेना विभाग प्रमुख अरुण कांबळे, गणेश वाघमारे, ईश्वर साळुंखे, शिवसेना शाखा प्रमुख प्रणित पवार, देवल परचंडे माजी उपशहर प्रमुख संजय ढाळे, सिद्राम कोष्ट्टी, कैलास नवले, सुरज लाडे, सतीश भोसले, सचिन घोडके, उपशाखा प्रमुख श्रीकांत शेळके, प्रणित चव्हान, भालचंद्र कारंडे तसेच बहुसंख्य पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.






























































