पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे एटीएसकडे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यात सीआयडीला अपयश आल्याने पानसरे हत्या प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने एटीएसकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सीआयडीने हा तपास एटीएसकडे वर्ग केला असून या संबंधित तपासाची कागदपत्रे आज एटीएसकडे सुपूर्द केली. पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींना पकडण्यात सीआयडीच्या एसआयटीला अपयश आल्याने पानसरे कुटुंबीयांनी हा तपास एटीएसकडे हस्तांतरीत करण्याची मागणी केली होती.