शिवसेनेचा दणका,दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असून धोकादायक रस्त्यांवर परभणीकरांचा जीवघेणा प्रवास सुरु होता. याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने रस्ता डागडुजीचे काम हाती घेतले आहे.

सध्या जिल्हाधिकारी कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम प्रत्यक्षात हाती घेतण्यात आले आहे. यामुळे परभणीकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

परभणी शहरात विशेषत: शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. या रस्त्यावर ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’अशी आवस्था झाली आहे. हा राष्ट्रीय मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत रस्त्यांची दुरुस्ती करत नसे. वारंवार मागणी करुनही रस्त्याचे खड्डे काही केल्या दुरुस्त केल्या जात नव्हते. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये देखील रस्ता मोठ्या प्रमाणात अत्यंत खराब झाला होता. याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नेधण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. त्याअंतर्गत शिवसेनेने रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावली. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती. उशिरा का होईना, प्रशासनास जाग आली असून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोरील राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ही केवळ डागडुजीच होत असल्याने अनेकांनी या कामाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. हा रस्ता खरोखरच टिकण्यासारखा आहे का? केवळ डागडुजी करुन बोळवण केली जात आहे की काय? असा सवाल यानिमित्त उपस्थित होते आहे.

संपूर्ण रस्ता हा उखडलेल्या अवस्थेत मागील वर्षभरापासून आहे. या रस्त्यावरुन प्रवास हा जीवघेणा प्रवास ठरत आहे. किमान दर्शनी भागावरील तरी रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी माफक अपेक्षा नागरिकातून मागील बरेच दिवसापासून होत होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर हे रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केल्या जात आहे. या रस्त्यावर मोठमोठी खड्डेच-खड्डे असल्याने आजुबाजूला सुरक्षा कवच विंâवा दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. किमान खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी होत असताना वसमत रोडवर उखडलेल्या रस्त्यावर मुरूम टावूâन डागडुजीचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. संबंधित कंत्राटदारास जबाबदार धरून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती.