आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील अनेक युवकांनी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगरातील आमदार संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, दिलीप गिराम आदी उपस्थित होते. यावेळी अजय गिरी, अफसर खान, शेख मोईन, गणेश पंडित, प्रकाश बागल, आबेद खान, जाहेद खान, सय्यद साजेद, आकाश जैस्वाल, आकाश कांबळे, अभिजीत कदम, उमेश हातागळे, गणेश बाळसकर, रामजी कुरवाडे, गणेश चव्हाण, रवि पवार, मधुकर घायतिलक, श्रीकांत हातागळे, अनिल लांडगे आदी युवकांना शिवबंधन व भगवे रुमाल देवून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.