पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून दाखवल्याने शिक्षकाचे शीर केले कलम

murder-knife

फ्रांसमधील पॅरिस शहरात एका शिक्षकाने वर्गात पैगंबर मोहम्मद याांचेे कार्टून विद्यार्थ्यांना दाखवल्याने एका माथेफिरू व्यक्तीने त्यांचे मुंडके उडवले. हत्येनंतर आरोपीने घोषणाबाजी देखील केली. आरोपीचा मुलगा देखील याच शाळेत शिकत असल्याचे समोर आले आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला हत्यार खाली ठेवण्यास सांगितले, मात्र आरोपीने उलट पोलिसांना धमकी दिल्याने पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या.

स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इतिहासाच्या शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना पैगंबर मोहम्मद यांचे कार्टून दाखवले होते. यामुळे आरोपी व्यथित झाला होता आणि संतापाच्या भरात त्याने चाकू घेऊन शिक्षकाला गाठले आणि शीर कलम केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथून 600 मीटर अंतरावर पोलिसांनी आरोपीचा गोळ्या घालून खात्मा केला.

दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों शिक्षकांच्या घत्येचा निषेध केला असून घटनेची निंदा केली आहे. धर्मांध लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. तसेच त्यांनी या शाळेला देखील भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या