
राजधानी, वंदे भारत, शताब्दी यासारख्या प्रिमिअम ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी ट्रेनचे तिकीट बुक करताना ‘नो मिल्स’ पर्याय निवडला तरी त्यांना पाण्याची बाटली मोफत मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना पाणी मोफत मिळेल. भले त्यांनी खाण्याचे पॅकेज घेतलेले असेल किंवा नसेल. पाणी ही प्रवाशांची मूलभूत गरज मानून मोफत सुविधेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
तिकिटांचे बुकींगं करताना प्रवासी भोजनाचा पर्याय निवडू शकतात. जरी बुकींगंच्यावेळी ‘ मिल्स’ हा पर्याय निवडलेला नसेल तरी प्रवासादरम्यान खाणे मागवायची सुविधा आहे. राजधानी, वंदे भारत यासारख्या प्रिमिअम ट्रेनमध्ये बुकींगंच्या वेळी हा पर्याय निवडावा लागतो. पर्याय निवडला नाही तर बुकींगं प्रक्रिया पुढे जात नाही.
काही प्रवाशांना वाटते की रेल्वेत जेवण मागवणे बंधनकारक आहे. मात्र असे ‘अजिबातच नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेत खाणे न मागवता प्रवास करता येईल आणि पाण्याची पाणी बाटली मोफत मिळेल, असे रेल्वेने स्पष्ट केले.



























































