हालसी तुगाव मधील मुख्य रस्ता बनला खड्डेयुक्त व चिखलमय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी

हालसी तुगाव मधील असलेल्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता खड्डेयुक्त व चिखलमय बनला आहे.

औराद शहाजानी जवळच असलेले सीमावर्ती भागातील हालसी तुगाव हे गाव जवळपास चार हजार ते पाच हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे शासनाचे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय व सातवी पर्यंतचे शिक्षण देणारी जिल्हा परीषदची शाळा आहे. या गावाला औरादहुन कर्नाटकातील तुगाव मार्गे वलांडी तसेच उदगीर जाणाऱ्या दररोज महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बसेस लोकांना घेऊन जातात. पण गेल्या १० वर्षापुर्वी या गावात तयार करण्यात आलेला जो मुख्य रस्ता आहे. तो रस्ता सध्या राजकीय नेते, पुढारी यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या बाजुला नाल्या नसल्यामुळे गावातील घराघरातील सांडपाणी दैनंदिन रस्त्यावर येते. या रस्त्यावर वाहनांनाच काय शाळेला जाणाऱ्या विद्याथ्र्यांना सुद्धा रस्ता चांगला राहीलेला नाही. या विषयी दररोज चौकात बसुन फक्त चर्चा होत असते पण शासनस्तरावर मागणी कोणीही करीत नसल्यामुळे या रस्त्यावरून फिरणे फार कठीण होत आहे.

या रस्त्याविषयी सरपंच राजकुमार गंगथडे यांना विचारले असता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीत असल्यामुळे या रस्त्यावर आम्हाला काहीच करता येत नाही. पण रस्त्याच्या बाजुने घराशेजारी नालीकाम लवकरच करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.