Video – पावन गडावर सापडला तोफगोळ्यांचा मोठा साठा, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला जोडूनच पूर्वेकडे लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या पावन गडावर गुरुवारी शिवकालीन दारूगोळ्याचा मोठा साठा सापडला. दिशादर्शक फलक लावण्यासाठी खड्डा खोदताना, चारशेहून अधिक तोफगोळे सापडले आहेत.

पूर्वेकडे नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड बांधून घेतला होता. वनविभाग आणि टीम पावनगड संस्थेच्या वतीने येथे दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. यासाठी खड्डा खोदताना त्यामध्ये हे तोफगोळे सापडले. यामुळे शिवभक्तांसह इतिहासप्रेमींमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पावनगडसारख्या प्रमुख गडकोटांवरील कोणतेही खोदकाम हे शास्त्राrय पद्धतीने होणे गरजेचे आहे. शासनामार्फत पुरातत्व खात्याकडून अशाप्रकारे उत्खनन होणे गरजेचे आहे, असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

हजारो तोफगोळे सापडतील – सुखदेव गिरी

406 तोफगोळे सुरक्षितरीत्या बाहेर काढले. पुरातत्व खात्याने याचा पंचनामा केला असून, जमिनीच्या खाली एक ते दीड फूट खाली हजारो तोफगोळे असण्याची शक्यता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य सुखदेव गिरी यांनी दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.