ATMचा वापर करणं आता अधिक महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षात मोबाईल बँकिंगला, कॅशलेस व्यवहारांना गती मिळाली असली तरी रोख व्यवहारही सुरू असतात. त्यामुळेच एटीएमचा वापर आजही सुरू आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणे आता बँकेच्या ग्राहकांना महाग पडणार आहे. एटीएमचा मोफत वापर करण्याची मर्यादा ओलांडल्यावर लागणारा कस्टमर चार्ज आणि एटीएम चार्जचे पैसे वाढवण्यात आले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एटीएमच्या वापरावर चार्जेस वाढवले आहेत. यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेशिवाय अन्य बँकेतून पैसे काढतात तेव्हा मोफत वापराच्या मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्यास जास्त पैसे कापले जाऊ शकतात. 1 ऑगस्ट, 2021 पासून ही वाढ लागू होईल.

कस्टमर चार्जची रक्कम प्रति ट्रांझॅक्शन 20 पासून 21 रुपये केले आहेत. अर्थात ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून एटीएमच्या ‘ज्यादा’ वापरानंतर अधिकची रक्कम मोजावी लागेल. हे चार्ज नव्या रीसाइक्लर मशीनसाठी देखील लागू होतील.

तर आरबीआयने इंटरचेंज फी 15 वरून वाढवून 17 रुपये एवढी केली आहे. तर बिगरआर्थिक ट्रांझॅक्शन फी 5 वरून 6 रुपये करण्यात आली आहे. बिगरआर्थिक ट्रांझॅक्शनमध्ये बँलेन्स तपासणे यासारख्या सोयी येतात.

एटीएमच्या वापरासाठी मेट्रो शहरात मोफत मर्यादा तीन आहे तर अन्य भागात पाच आहे.