‘नागिन’ मालिकेमुळे चमकलेल्या पर्ल पुरीला अटक, लहान मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

नागिन-3 मालिकेमुळे चमकलेल्या पर्ल पुरी या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. वसईतील वालीव पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लहान मुलीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. पीडीत मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पर्लला अटक केली आहे.

पीडितेने म्हटलंय की पर्लने तिच्यावर गाडीमध्ये बलात्कार केला आणि त्यानंतर त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी पर्लविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.


पर्ल हा नागिन-3 मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आला होता. काही महिन्यांपूर्वी त्याचे नाव अभिनेत्री करीश्मा तन्नासोबत जोडले गेले होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं बोललं जात होतं. कालांतराने दोघांत काहीतरी बिनसलं आणि पर्ल आणि करीश्मा वेगळे झाले अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. हे दोघेही आजही आपण एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या