सायकल योजनेतील पेडल कंपनीची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन, पुणे
पुणे शहरात धुमधडाक्यात सुरू करण्यात आलेली पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेतून पेडल या कंपनीने माघार घेतली आहे. त्यांनी या योजनेसाठी दिलेल्या चार हजार सायकली परत घेतल्या आहेत. त्यासाठी सायकलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले आहे.
शहरात एकात्मिक सायकल आराखडा योजनेनुसार एकूण ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रस्तावित आहेत. त्यांपैकी पथ विभागामार्पâत सुमारे २६ किलोमीटरचे ट्रॅक तयार केले आहेत. ६५ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक प्रगतीपथावर आहेत.  पब्लिक बायसिकल शेअरिंग योजनेसाठी पालिकेने कोणत्याही खर्च केलेला नाही. साकलीचा वापर, नागरिकांची मागणी यानुसार फग्र्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, कर्वे, एमआयटी, शिवाजीनगर, कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सिंहगड रोड, नांदेड सिटी, कर्वेनगर, बी.टी. कवडे रस्ता, अ‍ॅमानोरा हडपसर, औंध, पुणे विद्यापीठ या भागात सुमारे ५२६ सायकल स्टेशन्सची आखणी पूर्ण करण्यात आलेली आहे.
शेअरिंग योजनेअंतर्गत अनेक कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत. त्या कंपन्यांनी सायकली स्वखर्चाने भाडेतत्त्वावर उपलब्ध करावयाच्या आहेत. त्यांची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपन्यांचीच असणार आहे. त्यापासून मिळणारे उत्पन्नही संबंधित कंपन्यांनाच मिळणार आहे. त्यातून पालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. पालिकेला त्यास आर्थिक तोषिस लागणार नाही. पेडल कंपनीने चार हजार सायकली, मोबाईकने अडीच हजार, इल्यू या कंपनीने  दोन हजार सायकली पुरविल्या आहेत. पेडल कंपनीने चार हजार सायकली पुरविल्या होत्या. मात्र, १२ डिसेबर २०१८ रोजी पत्र पाठवून त्यांच्या सायकलींमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दिले आहे. या सायकली अद्ययावत करण्यासाठी २१ डिसेंबर २०१८ पासून पेडल कंपनीने चार हजार सायकली परत घेतल्या आहेत, अशी धक्कादायक लेखी माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी सर्वसाधारण सभेसाठी विचारलेल्या प्रश्नोत्तरातून समोर आली आहे.