
सामना ऑनलाईन । मुंबई
कश्मीरसंबंधी कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल ठरवल्याने राज्यात शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला
बीडमध्ये ढोल ताशाचा गजर
गेल्या सत्तर वर्षांपासून एकसंघ राष्ट्रीयत्वाला धोकादायक असलेले जम्मू काश्मीरचा 370 कलम रद्द करत आज केंद्र सरकारने काश्मीर स्वतंत्र केल्याचा आनंद उत्सव परळी शिवसेनेच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत ढोल ताशाचा गजर करण्यात आला.राष्ट्रभक्तीपर घोषणांनी आज राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसर दमदुमून गेला होता.
तब्बल सात दशकापासून डोके दुःखी असलेला काश्मीर प्रश्न केंद्रातील महायुतीच्या सरकारने मार्गी लागल्या बद्दल शिवसेनेच्या वतीने राणी लक्ष्मी बाई टॉवर येथे ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी शिवसेना परळी विधानसभा संपर्क प्रमुख दत्ता आवाड शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय कुमार ठक्कर,तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेणमध्ये शिवाजी महाराज चौकात वाटले पेढे
मोदी सरकारने जम्मू काश्मीर राज्यातील विशेष अधिकार कलम 370 व 35अ कलम रद्द केल्याने शिवसेना पेण विधानसभा व तालुक्यातर्फ पेण येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
मोदी सरकारने काश्मीर संदर्भात घेतलेल्या या क्रांतीकारक निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी पूर्ण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षक मंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे शिवसेने तर्फ स्वागत केल्याची प्रतिक्रीयाशिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी दिली.
























































