‘बाबा का ढाबा’वर तुफान गर्दी; सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत एक वृध्द माणूस आपल्या बायकोसह ढाबा चालवित असून लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या ढाब्यावर कोणीही जात नसल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ‘बाबा का ढाबा’ असे या ढाब्याचे नाव आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या ढाब्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली असून त्यांच्या मदतीला अनेकजण पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही गर्दी इतकी वाढली की त्यांना नाइलाजास्तव दुकान बंद करण्याची वेळ आली.