कश्मीरात पोलिसांना गॅसरोधक मास्क, मिरपुडीच्या गोळ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये ‘पत्थरबाज’ जमावाचा मुकाबला करीत कायदा-सुव्यवस्था राखणाऱया पोलिसाना गॅसरोधक मास्क आणि प्राणघातक नसलेल्या मिरपुडीच्या गोळय़ा (बुलेटस्) पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे टेंडर काढण्यात आले आहे अशी माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱयांनी दिली. मिरपुडीच्या गोळय़ांचा मारा हिंसक जमावावर केला जाणार आहे.