
देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यात 22 जूनपर्यंत संचारबंदी असेल, अशी माहिती कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी दिली.
‘आरटी-पीसीआर’चा निगेटिव्ह अहवाल असेल तर चामोली जिल्ह्यातील रहिवासी बद्रीनाथ धाम, रुद्रप्रयाग जिल्ह्यांतील केदारनाथ आणि उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन घेऊ शकतील. लग्नात आणि अंत्यसंस्कारात येणाऱया लोकांची संख्या 20 वरून 50 करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र लग्नाला उपस्थित राहणाऱयांसाठी ‘आरटी-पीसीआर’ कोविड चाचणी अहवाल अनिवार्य आहे.



























































