कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एण्ट्री

नृत्य आणि आपल्या दिलखेच अदांनी रसिक श्रोत्यांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलला कोल्हापुरात नो एण्ट्री असणार आहे. गणेशोत्सवानिमित्त करवीर आणि राधानगरी तालुक्यातील काही मंडळांनी गौतमीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, बंदोबस्ताचे कारण देऊन गौतमीला परवानगी नाकारण्यात आली आहे.