पार्किंगवरून संभाजीनगरध्ये व्यापार्‍याची हत्या

22

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

किरडपूरा परिसरातील दरबार हॉटेल जवळ किराणा दुकानचालकाने दुकानासमोर दुचाकी लावण्यास काही तरुणांना मनाई केली. या रागात तीन ते चौघांनी व्यापार्‍यावर कात्री आणि दाभणाने हल्ला केला. या हल्ल्यात दुकानचालक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

किरडपुरा भागात समदखान अहमद खान यांचे दुकान आहे. या दुकानासमोर काही तरुण दुचाकी उभी करत होते. ही दुचाकी दुसरीकडे उभी करी अशी विनंती खान यांनी या तरुणांना केली. या दरम्यान तरुण आणि खान यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नंतर जमीर पटेल आणि नुमान पटेल या दोघांनी खान यांच्यावर कात्री आणि दाभणाने हल्ला केला. या हल्ल्यात खान गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थाळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी खान यांना घाटी रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या