लोकलमध्ये तरुणींसोबत अश्लील चाळे, लिंगपिसाट हेल्परला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वाशी स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या तरुणींशी अश्लील कृत्य करणारा लिंगपिसाट तरुण अखेर सापडला. वाशी रेल्वे पोलीस व रेल्वे क्राइम ब्रँचच्या पथकाने त्या तरुणाला कुर्ला स्थानकात पकडले.

सुमिता ( नाव बदललेले) ही मूळची मणिपूरची असून ती सध्या देवनार येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे शिक्षण घेत आहे. 11 तारखेला सुमिता तिच्या अन्य दोघी मैत्रिणींसोबत फिल्ड वर्ककरिता रबाळे येथे गेले होते. रबाळे येथील काम झाल्यानंतर पुन्हा गोवंडीला येण्याकरिता त्या तिघी वाशीला गेल्या. तेथे त्या सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलच्या मधल्या ठिकाणी असलेल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात चढत असताना अज्ञात इसमाने सुमिताच्या गुप्तांगाला हात लावला. त्यानंतर तो तरुणींपाठोपाठ डब्यात चढला. मग डब्यातदेखील त्या लिंगपिसाटाने सुमितासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी सुमिताने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर वाशीचे पोलीस निरीक्षक सस्ते व त्यांचे पथक तसेच क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे व त्यांचे पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. सुमिताने आरोपीचा फोटो काढला होता. त्यामुळे पोलिसांनी फोटोच्या आधारे शोध सुरू केला. फलाटावरील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तो भामटा टिळकनगर स्थानकात उतरताना दिसला. अखेर कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 7 वर तो सापडला. अय्याज सत्तार कुरेशी (26) असे त्या तरुणाचे नाव असून तो हेल्परचे काम करतो आणि मानखुर्दमध्ये राहतो.

summary- pervert got arrested by railway police