
फलटण शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत बनकर याला न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी प्रशांत बनकर याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने फलटण पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे.
डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर या घटनेतील दुसरा संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. बदने आणि प्रशांत या दोघांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला, असे हातावर लिहून महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती.



























































