
वाघळवाडी- सोमेश्वरनगरमधील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक नारायण मधुकरराव राजूरवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यावर प्रबंध सादर केला. राजूरवार मागील 11 वर्षांपासून मु. सा. काकडे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डॉ. लोधी फातिमा यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, प्राचार्य जवाहर चौधरी, सचिव प्रा. जयवंत घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.































































