1 / 13
सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे सचिन देव बर्मन यांच्या संगिताचे चाहते होते. यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव सचिन ठेवले.
सचिन तेंडुलकर हा 'कारप्रेमी' देखील आहे. त्याची फरारी कार त्याला अतिशय प्रिय असून तो पत्नी अंजलीलाही फरारी चालवायला देत नाही.
1995 साली 'रोजा' चित्रपट पाहण्यासाठी सचिन पेहराव बदलून थेअटरमध्ये गेला होता. मात्र ऐनवेळी चष्मा पडल्याने लोकांनी त्याला ओळखले. तेव्हा त्याची खूप फजिती झाली होती.
आपल्या करिअरच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाज होण्याची सचिनची इच्छा होती. मात्र 1987 एमआरएफ पेस फाउंड़ेशनने त्याला अपात्र ठरवलं होतं.
सरावादरम्यान सचिनने जर दिवसभर नेटमध्ये नाबाद फलंदाजी केल्यास त्याला रमाकांत आचरेकरसर एक रुपयाचे नाणं द्यायचे, सचिनकडे अशी 13 नाणी आहेत.
हिंदुस्थानच्या हवाई दलाने सचिनला 'ग्रुप कॅप्टन' हा हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळवणारा आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेला तो पहिला ग्रुप कॅप्टन आहे.
राज्यसभेवर कला आणि क्रीडा या विभागातून खासदार म्हणून निवडला गेलेला सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू आहे.




























































