
आयसीसी टी-20 वर्ल्डकपला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन-चार दिवसातच तुल्यबळ लढती पाहायला मिळाल्या. वर्ल्डकप जसा पुढे सरकेल तशी आणखी रंगत वाढत जाईल. यंदा कोण सेमीफायनल गाठणार, कोण वर्ल्डकप उंचावणार याबाबत विविध खेळाडू भाकीतही वर्तवत आहेत. विशेष म्हणजे हिंदुस्थान, वेस्ट इंडिज, इंग्लंड हे तीनच संघ असे आहेत ज्यांनी दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. तर 9 खेळाडूंना दोन वर्ल्डकप उंचावण्याची संधी मिळाली आहे. हे नऊ खेळाडू कोण जाणून घेऊया…
1. रोहित शर्मा हिंदुस्थानचा एकमेव खेळाडू आहे ज्याने 2007 ला पहिला आणि 2024 ला दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकला. 2007 मध्ये अंतिम लढतीत त्याने पाकिस्तानविरुद्ध 30 धावांची खेळी केली होती, तचर 2024 मध्ये कर्णधार म्हणून खेळताना स्पर्धेत 257 धावा केल्या होत्या.

2. वेस्ट इंडिजने दोन वेळा (2012 आणि 2016) वर्ल्डकप जिंकला आणि दोन्ही वेळा डॅरेन सामा कर्णधार होता. दोन टी-20 वर्ल्डकप जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.

3. मार्नस सॅम्युयल्स हा बड्या मॅचचा खेळाडू मानला जातो. 2012 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्डकप जिंकता तेव्हा दोन्ही अंतिम लढतीत तो सामनावीर पुरस्कार जिंकला होता.

4. ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल याने 2012 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये घुमाकूळ घातला होता. तसेच 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 48 चेंडूत झंझावाती शतक ठोकले होते.

5. ड्वेन ब्राव्हो हा वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू होता. 2012 मध्ये त्याने फलंदाजीत, तर 2016 मध्ये गोलंदाजीत (9 विकेट्स) महत्त्वाचे योगदान दिले होते.

6. वेस्ट इंडिजने 2012 मध्ये पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा आंद्रे रसेल नवखा होता. पण 2016 मध्ये सेमीफायनल लढतीत त्याने हिंदुस्थानविरुद्ध 43 धावांची खेळी करत संघाला फायनलपर्यंत पोहोचवले होते.

7. जॉन्सन चार्ल्स हा यष्टीरक्षक फलंदाज होता. त्याने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध 84 धावांची खेळी केली होती, तर 2016 च्या सेमीफायनलमध्ये हिंदुस्थान विरुद्ध 52 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

8. सॅम्युअल बद्री हा विंडीजचा हा लेग स्पिनर होता. चेंडूवर जबरदस्त नियंत्रण ठेवण्यासाठी तो ओळखला जायचा. 2016 च्या विश्वचषकात त्याने 5.39 च्या इकॉनॉमी रेटने 9 बळी घेतले होते.

9. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश रामदिन दोन्ही विश्वविजेत्या विंडीज संघाचा भाग होता. त्याने यष्टीमागे अनेक महत्त्वाचे झेल आणि यष्टीचीत केले आहेत.



























































