मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिपलेली अप्रतिम छायाचित्रे, पर्यटन विभागाकडून शुभेच्छांसह ट्विट

फोटो सौजन्य - Photographs: http://www.uddhavthackeray.com

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने उद्धव ठाकरे यांनी टिपलेली काही छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडल @maharashtratourismofficial वरून प्रसिद्ध केली आहेत. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे. निसर्ग आणि वन्यप्राण्यांची त्यांनी टिपलेली छायचित्रे प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर राज्यातील गडकिल्ल्यांची, वारीची त्यांनी हेलिकॉप्टरमधून टिपलेली छायाचित्रे अप्रतिम असून त्याची पुस्तके देखील प्रसिद्ध झाली आहेत.

तसेच आपल्या @maharashtratourismofficial ने आपल्या ट्विटमधून म्हटलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ‘या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुमचे पर्यटनावर असलेले प्रेम, छायाचित्रणाची आवड आणि महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रासाठीचे तुमचे ध्येय प्रेरणादायी आहे.’


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

आपली प्रतिक्रिया द्या