
वाहन चालकांना चुकीच्या पद्धतीचे ई-चलान आकारले जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने राज्यव्यापी आंदोलन.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)

ई-चलान प्रणालीद्वारे वाहनधारकांची नियमबाह्य पद्धतीने लूट सुरू आहे.

ई-चलान प्रणालीतील त्रुटी दूर करणे, एकाच गुन्ह्यासाठी वारंवार दंड आकारणे बंद करणे.

पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवणे.

या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतला आहे.

ट्रक, टेम्पो, स्कूल बस, खाजगी टुरिस्ट बस, टॅक्सी आणि रिक्षा या संपात सहभागी झाले आहेत.

ज्यातील हजारो वाहतूकदार मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

जोपर्यंत ठोस सरकारी निर्णय (GR) निर्गमित होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाहतूकदारांनी घेतला आहे.





























































