
अभिनेत्री क्रिती सेनन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या मिमी या चित्रपटावर पुरस्कारांचा पाऊस पडला आहे. बरेली की बर्फी, लुकाछुपी, मिमी, राबता असे नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचे चित्रपट केल्यामुळे क्रितीने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या निमित्ताने तिचं एक फोटोशूट व्हायरल होत आहे. यात तिने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे.






























































