Photo – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच उद्घाटन

(सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘आदित्य चषक’ 18 वर्षांखालील (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पाडलं. 

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

शिवशक्ती महिला संघाच्या वतीने ‘आदित्य चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

14 ते 18 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेते दोन्ही संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितले. 

या स्पर्धेसाठी राज्यातील 25 जिह्यांमधील मुलांचे 31 आणि मुलींचे 31 संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेतील सर्व सामने बंदिस्त क्रीडा संकुलात चार मॅटच्या क्रीडांगणावर साखळी पद्धतीने होणार आहेत. सर्व सामने सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात खेळवले जाणार आहेत.

स्पर्धेतील विजेते संघ उत्तर प्रदेशमधील हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलै या कालावधीत होणाऱ्या 18 वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

पुण्यात पार पडणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एक हजार खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, विविध समित्यांमधील प्रतिनिधीची भोजन-निवास व्यवस्था क्रीडा संकुलात करण्यात आली आहे.