
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
क्रिकेटप्रमाणे आता कबड्डीमध्येही कायापालट होण्याचे संकेत मिळाले आहेत. जनार्दनसिंग गहलोत यांचे एकछत्री राज्य संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिल हिंदुस्थानी कबड्डी फेडरेशनच्या व्यवहाराची संपूर्ण चौकशी आणि राष्ट्रीय क्रीडा आचारसंहिता धोरणानुसार घटना दुरुस्ती झाल्यानंतरच निवडणूक घेण्यात यावी. त्याआधी झालेली निवडणूक अधिकृत मानू नये. अशा प्रकारची याचिका महिपाल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.



























































