
पूर्ववैमनस्यातून बाप-लेकाने शेजारी राहणाऱ्या तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी सळई, लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना निगडी – यमुनानगर येथे घडली आहे.
विवेक त्रिंबक शिंदे (वय 32), त्रिंबक तुकाराम शिंदे (वय 55, रा. यमुनानगर, निगडी) असे गुन्हा गुन्हा दाखल केलेल्या बाप-लेकाचे नाव आहे. भिमाजी नाना गायकवाड (वय 54, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. याच भांडणातून आरोपी फिर्यादी भिमाजी यांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी भिमाजी यांचा मुलगा पंकज आरोपींना ‘तुम्ही शिवीगाळ करू नका’ असे म्हणाला. त्यामुळे चिडलेल्या विवेकने लोखंडी सळई फिर्यादी भिमाजी यांच्या डोक्यात घातली. तसेच पंकजला लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.






























































