हा संघाने पसरवलेल्या द्वेषाचा परिणाम आहे, सर्वोच्च न्यायालयातील घटनेवर केरळच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश बीआर गवई यांच्यावरप आज सुनावणीदरम्यान एका वकिलाने बूट फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. यावर बोलताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फटकारले आहे.’

”सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध करतो. ही अत्यंत चिंताजनक घटना असून हा संघाने पसरवलेल्या द्वेषाचा परिणाम आहे. याला एखाद्या व्यक्तीने केलेले कृत्य म्हणून नाकारणे म्हणजे असहिष्णुतेच्या वाढत्या वातावरणाकडे दुर्लक्ष करणे आहे. जातीय कट्टरतेतून देशाच्या सरन्यायधीशांवर हल्ला करण्याचे धाडस केले जाते तेव्हा देशात वाढणाऱ्या फुटीर आणि विषारी राजकारणाच्या वाढत्या धोक्याचा ताकदीने सामना करायला हवा”, असे विजयन यांनी सांगितले.