
सामना ऑनलाईन । नागपूर
सूर्या प्रकल्पातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मीरा-भाईंदर महानगरपालिकेला एकूण १४६.३३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी देण्यास राखीव ठेवले आहे पण वैतरणा खोऱ्यातील पिंजाळ प्रकल्पाचे काम अजून हाती घेतलेले नाही असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज लेखी उत्तरात दिले. पालघर जिह्यातील सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई, विरार, मीरा-भाईंदर व मुंबई महापालिकेला देण्याबाबत आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रश्न विचारला होता.

































































