पाकिस्तानात खळबळ, विशेष अधिवेशन बोलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कराची

जम्मू-कश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थान सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीच बदलणार आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाच संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तान सरकारने यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवले आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे प्रमुखही या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. सद्यस्थितीत या अधिवेशनात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.