
घराचे प्लॅस्टरकाम सुरू असताना गवंड्याच्या हातून सिमेंट शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत पडलं. या रिकाम्या जागेत काही तरुण आणि मुलं बसली होती. त्यांच्या जवळ हे सिमेंट पटल्याने त्यांनी गवंड्याशी भांडायला सुरूवात केली.
जसीम(22) हा गवंडी म्हणून काम करत होता आणि बवाना इथल्या जेजे कॉलनीमध्ये राहात होता. तो काम करत असताना थोडं सिमेंट बाजूला पडल्याने तरूणांनी आणि अल्पवयीन मुलांनी जसीमशी वाद घातला. वादादरम्यान एका आरोपीने जसीमवर चाकूने वार केला. ज्या आरोपींनी त्याला मारहाण केली त्यात दोघेजण अल्पवयीन असल्याचं कळालं आहे. आरोपी मोमोज खात असताना बाजूला सिमेंट पडल्याने हा वाद उफाळून आला असं पोलिसांनी सांगितलं आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जसीमला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

























































