उद्यापासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद, ग्राहकांना इशारा तर दुकानदार, फेरीवाले, मॉलवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरण रक्षणासाठी पालिका सोमवार, 21 ऑगस्टपासून प्लॅस्टिक पिशवीबंदीची धडक कारवाई सुरू करणार आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱयासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱयांचा समावेश असलेल्या भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे. कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली.

मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याच्या पार्श्वभूमीवर 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर आणि उत्पादनावर बंदी घालण्यात आली. पालिका दुकाने व आस्थापने विभागाकडून नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. मात्र 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रतिबंधित प्लॅस्टिक कारवाई थंडावली. मात्र कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर 1 जुलै 2022 पासून पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचा परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभागांकडून ही कारवाई सुरू होती. यामध्ये आता पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयाच्या सहाय्याने कारवाई करण्यात येणार आहे.

5 ते 25 हजारांचा दंड

पालिकेकडून करण्यात येणाऱया कारवाईत उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विव्रेते यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम 2006 च्या कलम 9 अन्वये पहिल्या गुह्यासाठी 5 हजार रुपये, दुसऱया गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास व 25 हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे.

एका वर्षात 82 लाखांचा दंड वसूल

1 जुलै 2022 पासून पालिकेने पुन्हा कारवाईला सुरुवात करताना आतापर्यंत 5371 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. दीड हजारांवर प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 82 लाख 50 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये 39 प्रकरणांत कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.