‘चारचौघी’ची जादू कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 31 वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर आलेल्या ‘चारचौघी’ या नाटकाने, जवळपास सगळे प्रयोग हाऊसफुल्ल घेत रंगभूमीवरील आपली घौडदौड कायम ठेवली आहे. मराठी रंगभूमीवर ‘चारचौघी’ हे नाटक त्यावेळी प्रचंड गाजले होते आणि तीच परंपरा नवीन संचात आलेल्या या नाटकाने आताही कायम राखली आहे. अलीकडेच या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोगही मोठया दिमाखात आणि रसिकांच्या हाऊसफुल्ल उपस्थितीत सादर झाला. या नाटकात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे या चौघींसह श्रेयस राजे, निनाद लिमये व पार्थ केतकर हे कलाकार भूमिका साकारत आहेत.

 नाटकाच्या या नवीन संचात आम्हाला ताकदीच्या अभिनेत्री मिळाल्या आहेत. ज्या जुन्या पिढीने हे नाटक आधी बघितले होते, ते सुद्धा हे नाटक नवीन संचात आवर्जून अनुभवत आहेत; तर नवीन पिढी उत्सुकतेने या नाटकाकडे वळत आहे. आताच्या प्रयोगांनाही रसिकांची उत्तम दाद मिळत असल्याचे पाहून आम्हाला आनंद वाटतो, अशा भावना या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी व्यक्त केल्या.   नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केले असून, दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.