
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक आजोबा अत्यंत सुंदर पद्धतीने व्हायोलीन वाजवून लोकांचे मनोरंजन करताना दिसतायत. व्हिडिओ शेअर करणाऱयानं असा दावा केला आहे की हे आजोबा कोलकाता येथील आहेत. त्यांचे नाव मात्र समजू शकले नाही. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. हे आजोबादेखील रोजीरोटीसाठी लोकांचं मनोरंजन करताना दिसतायत. आजोबा व्हायोलीनवर ‘अजीब दास्तां है ये’ आणि ‘दीवाना हुआ बादल’ यासारखी गाणी वाजवताना दिसतायत. त्यांचं व्हायोलीन वाजवण्याचं स्कील पाहून नेटिझन्सही थक्क झाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



























































