महाराष्ट्र के लोग बहाद्दूर! पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

महाराष्ट्र के लोग बहाद्दुरी से कोविड का सामना करते है…अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राने कोरोना विषाणुच्या विरोधात पुकारलेल्या लढ्याचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी विशेष पथके नियुक्ती केल्यास देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होईल असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांचे  मुख्यमंत्र्यांनी यामध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी या सात राज्यातील कोरोनाच्या संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला.

पंतप्रधानांना भावले उद्धव ठाकरेंचे उदाहरण

सात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोरोनाच्या उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले की, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांचे हे उदाहरण इतके आवडले कि त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा  उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली  अपरिहार्यता आहे असे सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या