काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचा विरोध केला आणि आता मीटू मीटू करतात, पंतप्रधान मोदींची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने असे सर्जिकल स्ट्राइक केले की, ते ना दहशतवाद्यांना कळाले, ना जवानांना ना देशात कुणाला कळाले. तसेच काँग्रेसने आधी सर्जिकल स्ट्राईकचे थट्टा केली आणी आता मी टू मीटू करायला लागले आहेत असेही मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की,“काँग्रेस पूर्वी म्हणायची की सर्जिकल स्ट्राईक असे काही नसते. आधी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची थट्टा मस्करी केली.  जेव्हा त्यांना कळाले की जनता मोदीसोबत आहेत. तर त्यांनी विरोध सुरू केला. यामुळे जनतेचे समर्थन अजून वाढले. आता हे समर्थन आपल्याकडे वळवण्यासाथी त्यांनी आम्हीमी सर्जिकल स्ट्राईक केले असे म्हणायला लागले. आधी थट्टा मग विरोध आता मी टू मी टू. एसी रुमध्ये मध्ये बसून काँग्रेस कागदाचे सर्जिकल स्ट्राईक करू शकतात.” कागद आणि व्हिडीओ गेममध्ये सर्जिकल स्ट्राईक झाले असतील तर ते 6 असो वा ती, 20 असो वा 25 हे  खोटं बोलणार्‍या लोकांना काय फरक पडतो असेही मोदी यावेळी म्हणाले.